---
title: "इथेरियम ॲप्लिकेशन्स"
metaTitle: "इथेरियम ॲप्लिकेशन्स | इथेरियमवरील विकेंद्रित ॲप्लिकेशन्स"
description: "इथेरियमवरील ॲप्स विनामूल्य, जागतिक आहेत आणि खाजगी कंपनीच्या सर्व्हरऐवजी सार्वजनिक ब्लॉकचेन वापरतात. याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एकच खाते वापरू शकता आणि तुमची गोपनीयता राखू शकता."
lang: mr
template: use-cases
emoji: ":handshake:"
sidebarDepth: 2
showDropdown: false
image: /images/doge-computer.png
summary: "इथेरियमवरील ॲप्स विनामूल्य, जागतिक आहेत आणि खाजगी कंपनीच्या सर्व्हरऐवजी सार्वजनिक ब्लॉकचेन वापरतात. याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एकच खाते वापरू शकता आणि तुमची गोपनीयता राखू शकता."
---

## सुपरपॉवर असलेले ॲप्स {#apps-with-superpowers}

इथेरियम ॲप्लिकेशन्स कदाचित नियमित ॲप्ससारखे वाटू शकतात. परंतु पडद्यामागे त्यांच्यात काही विशेष गुण आहेत.

एकदा ॲप इथेरियम ब्लॉकचेनवर प्रकाशित झाले की, ते थांबवणे अशक्य होते. याचे कारण असे की इथेरियम नेटवर्क जगभरातील हजारो संगणकांवर विकेंद्रित आहे. इथेरियमवर चालणारे ॲप्स कोणीही बंद करू शकत नाही, कारण लक्ष्य करण्यासाठी कोणताही एकच सर्व्हर नसतो. इथेरियम तटस्थ देखील आहे आणि त्यामुळे जगातील कोणीही कुठेही ते वापरू शकतो किंवा त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो आणि त्यावर स्वतःचे बदल तयार करू शकतो.

## dapp म्हणजे काय? {#what-is-a-dapp}

इथेरियम ॲप्लिकेशन्सचे लॉजिक केंद्रीकृत सर्व्हरऐवजी इथेरियम ब्लॉकचेनवर चालते. म्हणूनच त्यांना अनेकदा विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (dapps) किंवा थोडक्यात dapps म्हटले जाते.

<Grid>
  <Card title="अधिक खाजगी" emoji=":detective:" description="कोणतेही dapp वापरण्यासाठी तुम्हाला फक्त इथेरियम वॉलेटची आवश्यकता आहे. तुमच्या वैयक्तिक माहितीची आवश्यकता नाही. इंटरनेट नेहमी असेच असायला हवे होते."/>
  <Card title="जागतिक स्तरावर प्रवेशयोग्य" emoji="🌍" description="Dapps प्रदेश आणि ॲप स्टोअरच्या नियमांद्वारे नियंत्रित केले जात नाहीत. तुमचा ॲक्सेस इंटरनेट कनेक्शन असण्यावर अवलंबून असतो - तुम्ही कुठे राहता यावर नाही." />
  <Card title="अधिक स्वस्त सेवा" emoji=":handshake:" description="Dapps पीअर-टू-पीअर आहेत. कोणताही मध्यस्थ कमिशन घेत नसल्यामुळे सेवा अधिक स्वस्त मिळतात." />
</Grid>

## हे का महत्त्वाचे आहे {#why-does-this-matter}

इथेरियम ॲप्स अशा गोष्टी करू शकतात ज्या पारंपारिक ॲप्ससह शक्य नाहीत. जसे की एखाद्या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला पैसे परत मिळतील या हमीसह आणि व्याजासह पैसे कर्ज देणे. व्यवहार हाताळण्यासाठी वकिलासारख्या "विश्वासार्ह" मध्यस्थाला पैसे न देता.

प्रत्येक गोष्टीसाठी ॲप्स आहेत: गेमिंग, फायनान्स, काम, मेसेजिंग, स्टोरेज आणि बरेच काही. बहुतांश ॲप्समध्ये तुम्हाला जाहिराती दाखवल्या जात नाहीत किंवा प्रतिबंधित ॲक्सेसद्वारे मर्यादित केले जात नाही.

कोणतेही इथेरियम ॲप वापरण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्हाला फक्त इथेरियम वॉलेट आणि थोडे ETH आवश्यक आहे.

## हे कसे काम करते {#how-does-it-work}

ॲप्स स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सद्वारे चालवले जातात — कोडचे तुकडे जे इथेरियम ब्लॉकचेनवर असतात. पारंपारिक ॲप्सच्या विपरीत, त्यांना चालवण्यासाठी कोणत्याही कंपनीची आवश्यकता नसते.

| वैशिष्ट्य | पारंपारिक ॲप्स | इथेरियम ॲप्स |
| ------- | ---------------- | ------------- |
| **यावर कोणाचे नियंत्रण असते?** | एक कंपनी | कोणाचेही नाही |
| **कशावर चालते** | खाजगी कंपनीचे सर्व्हर्स | सार्वजनिक इथेरियम ब्लॉकचेन |
| **हे सेन्सॉर केले जाऊ शकते का?** | होय | नाही |
| **तुमच्या डेटाचा मालक कोण आहे?** | सहसा तुम्ही नाही | तुम्ही तुमच्या डेटाचे मालक आहात |

<WhatAreAppsStories />

<div className="w-full md:w-1/2 mx-auto md:mx-0">

![Illustration of Ethereum developer block building](./developers-eth-blocks.png)

</div>

## इथेरियम ॲप्स लेगोसारखे आहेत {#ethereum-apps-are-like-legos}

जेव्हा सर्व ॲप्स इथेरियमवर तयार केले जातात, तेव्हा ते सर्व सुसंगत असतात. एका ॲपसाठी असलेले टोकन, पूर्णपणे वेगळ्या ॲपवर काम करेल. हे तुमच्या फेसबुक् वॉलवर ट्विट्स प्रकाशित करण्यासारखे आहे. किंबहुना अनेकदा तुम्ही सर्वत्र स्वतंत्रपणे नोंदणी न करता अनेक वेगवेगळ्या इथेरियम ॲप्समध्ये एकच प्रोफाईल पुन्हा वापरू शकता.

<BrowseApps />

## पुढील वाचन {#further-reading}

- [नवशिक्यांसाठी इथेरियम](/what-is-ethereum)
- [स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय?](/developers/docs/smart-contracts/)
- [तांत्रिक dapp दस्तऐवजीकरण](/developers/docs/dapps/)

## वारंवार विचारले जाणारे प्रश्न {#faq}

<ExpandableCard title="dapp चे पूर्ण रूप काय आहे?" visible>
  <p>Dapp म्हणजे विकेंद्रित ॲप्लिकेशन्स (dapps). हे इथेरियमसारख्या ब्लॉकचेन नेटवर्कवर तयार केलेले ॲप्लिकेशन्स आहेत. त्यांना विकेंद्रित म्हटले जाते कारण अंतर्निहित नेटवर्क विकेंद्रित असते.</p>
</ExpandableCard>

<ExpandableCard title="मी dapp वर कॉइन्स खरेदी करतो का?" visible>
  <p>काही ॲप्लिकेशन्स तुम्हाला क्रिप्टो टोकन ट्रेड करू देतात किंवा खरेदी करू देतात, परंतु सर्व ॲप्स त्यासाठी नसतात. जर तुम्ही तुमचे पहिले टोकन खरेदी करू इच्छित असाल, तर [ETH मिळवा](/get-eth) ला भेट द्या.</p>
</ExpandableCard>

<ExpandableCard title="सर्वोत्तम क्रिप्टो वॉलेट कोणते आहे?" visible>
  <p>क्रिप्टो वॉलेट तुम्हाला तुमचे टोकन ठेवू देते आणि तुमचे इथेरियम खाते व्यवस्थापित करू देते. अनेक उत्तम वॉलेट्स आहेत, प्रत्येक वेगळ्या उद्देशासाठी काम करते. तुमच्यासाठी कोणते वॉलेट सर्वोत्तम आहे हे शोधण्यासाठी, आमच्या [वॉलेट्सच्या सूचीला](/wallets/find-wallet) भेट द्या.</p>
</ExpandableCard>

<Divider />

<QuizWidget quizKey="what-are-apps" />
