
Ethereum मध्ये आपले स्वागत आहे
Ethereum हे क्रिप्टोकरन्सी इथर (ETH) आणि हजारो विकेंद्रित अनुप्रयोगांना सामर्थ्य देणारे समुदाय चलित तंत्रज्ञान आहे.
सुरू करा
ethereum.org हे Ethereum च्या जगातील तुमचे पोर्टल आहे. तंत्रज्ञान नवीन आणि सतत विकसित होत आहे – एखादी मार्गदर्शिका असण्याने मदत होते. जर तुम्हाला यात बुडी मारायची असेल तर आम्ही तुम्हाला खालील गोष्टींची शिफारस करतो.


पाकीट निवडा
वॉलेट तुम्हाला Ethereum शी जोडते आणि तुम्ही तुमचा निधी व्यवस्थापित करू शकता.

ETH मिळवा
Ethereum चे चलन ETH आहे - त्याचा वापर तुम्ही अनुप्रयोगांमध्ये करू शकता.

dapp वापरा
Dapps हे Ethereum समर्थित आहेत. आपण काय करू शकता ते पहा.

निर्माण करायला प्रारंभ करा
जर तुम्हाला संकेत लेखन Ethereum सोबत चालू करायचे असल्यास, आमच्याकडे दस्तऐवज, शिकवण्या आणि आणखी भरपूर काही विकासक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Ethereum म्हणजे काय?
Ethereum तंत्रज्ञान हे अंकात्मक पैसे, जागतिक देयके आणि अनुप्रयोग यांचे मुख्य स्थान आहे. या समुदायाने भरभराट होत असलेली अंकात्मक अर्थव्यवस्था, निर्मात्यांसाठी ऑनलाइन कमाईचे नवीन मार्ग आणि बरेच काही तयार केले आहे. तुम्ही जगात कुठेही असला तरी हे प्रत्येकासाठी खुले आहे – तुम्हाला फक्त इंटरनेटची गरज आहे.

अधिक न्याय्य आर्थिक प्रणाली
आज, अब्जावधी लोक बँक खाती उघडू शकत नाहीत, तसेच अनेकांची देयके अवरोधित आहेत. Ethereum ची विकेंद्रित अर्थव्यवस्था (DeFi) प्रणाली कधीही निष्क्रिय होत नाही किंवा भेदभाव करत नाही. फक्त इंटरनेट कनेक्शनसह, तुम्ही जगात कुठेही पाठवू शकता, प्राप्त करू शकता, कर्ज घेऊ शकता, व्याज मिळवू शकता आणि निधी प्रवाहित करू शकता.
