हे क्षेत्र दररोज बदलत आहे. इथेरियम वापरकर्त्यांच्या शब्दसंग्रहात सतत नवीन संज्ञा येत आहेत आणि इथेरियमशी संबंधित सर्व गोष्टींसाठी अचूक, अद्ययावत संदर्भ प्रदान करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. सध्याचा शब्दकोश तपासा आणि तुम्हाला मदत करायची असल्यास खाली पहा!
निकष
नवीन शब्दकोशातील संज्ञांचे खालील निकषांद्वारे मूल्यांकन केले जाईल:
- संज्ञा/व्याख्या अद्ययावत आणि सध्या प्रासंगिक आहे का?
- शब्दकोशात आधीपासूनच अशीच एखादी संज्ञा आहे का? (तसे असल्यास, नवीन संज्ञा जोडण्याचे फायदे विरुद्ध विद्यमान संज्ञा अद्यतनित करण्याचे फायदे विचारात घ्या)
- संज्ञा/व्याख्या उत्पादन जाहिरात किंवा इतर प्रचारात्मक सामग्रीपासून मुक्त आहे का?
- संज्ञा/व्याख्या थेट इथेरियमशी संबंधित आहे का?
- व्याख्या वस्तुनिष्ठ, अचूक आणि व्यक्तिनिष्ठ निर्णय किंवा मतापासून मुक्त आहे का?
- स्रोत विश्वासार्ह आहे का? ते त्यांच्या स्रोतांचा संदर्भ देतात का?
तुमची संज्ञा जोडा
जर तुम्हाला ethereum.org च्या शब्दकोशात एखादी संज्ञा जोडायची असेल आणि ती निकषांची पूर्तता करत असेल, तर GitHub वर एक इश्यू (issue) तयार करा (नवीन टॅबमध्ये उघडते).