मुख्य आशयावर जा

ब्लॉकचेन सेतू

Web3 आता स्तर १ (L1) ब्लॉकचेन आणि स्तर २ (L2) स्केलिंग सोल्यूशन्सच्या इकोसिस्टममध्ये विकसित झाले आहे, ज्यापैकी प्रत्येक अद्वितीय क्षमता आणि तडजोडींसह डिझाइन केलेले आहे. ब्लॉकचेन प्रोटोकॉलची संख्या जसजशी वाढत आहे, तसतशी क्रॉस-चेन मालमत्ता हलवण्याची मागणीही वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, आपल्याला सेतूंची आवश्यकता आहे.


सेतू म्हणजे काय?

ब्लॉकचेन सेतू भौतिक जगात आपल्याला माहीत असलेल्या सेतूंप्रमाणेच काम करतात. ज्याप्रमाणे भौतिक सेतू दोन भौतिक ठिकाणांना जोडतो, त्याचप्रमाणे ब्लॉकचेन सेतू दोन ब्लॉकचेन इकोसिस्टम्सना जोडतो. सेतू माहिती आणि मालमत्तेच्या हस्तांतरणाद्वारे ब्लॉकचेन दरम्यान संवादाची सुविधा देतात.

चला एक उदाहरण पाहूया:

तुम्ही यूएसए मधील आहात आणि युरोपच्या सहलीची योजना आखत आहात. तुमच्याकडे USD आहेत, पण तुम्हाला खर्च करण्यासाठी EUR ची आवश्यकता आहे. तुमचे USD देऊन EUR मिळवण्यासाठी तुम्ही थोड्या शुल्कासह चलन विनिमय (currency exchange) वापरू शकता.

पण, जर तुम्हाला वेगळी वापरण्यासाठी असाच विनिमय करायचा असेल तर तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला इथरियम मेननेटवरील च्या बदल्यात आर्बिट्रम् (opens in a new tab) वरील ETH हवे आहे. आपण EUR साठी केलेल्या चलन विनिमयाप्रमाणेच, आपल्याला आपले ETH इथेरियमवरून आर्बिट्रम् वर हलवण्यासाठी एका यंत्रणेची आवश्यकता आहे. सेतू असा व्यवहार शक्य करतात. या प्रकरणात, आर्बिट्रम् कडे एक मूळ सेतू आहे (opens in a new tab) जो मेननेटवरून आर्बिट्रम् वर ETH चे हस्तांतरण करू शकतो.

आपल्याला सेतूंची आवश्यकता का आहे?

सर्व ब्लॉकचेनच्या स्वतःच्या मर्यादा असतात. इथेरियमला स्केल करण्यासाठी आणि मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याला ची आवश्यकता भासली आहे. याउलट, Solana आणि Avalanche सारख्या L1s ची रचना वेगळ्या प्रकारे केली गेली आहे जेणेकरून उच्च प्रक्रिया क्षमता सक्षम करता येईल, परंतु विकेंद्रीकरणाच्या किंमतीवर.

तथापि, सर्व ब्लॉकचेन वेगळ्या वातावरणात विकसित केल्या जातात आणि त्यांचे नियम आणि यंत्रणा भिन्न असतात. याचा अर्थ असा की ते मूळतः संवाद साधू शकत नाहीत आणि टोकन्स ब्लॉकचेन दरम्यान मुक्तपणे फिरू शकत नाहीत.

ब्लॉकचेन जोडण्यासाठी सेतू अस्तित्वात आहेत, जे त्यांच्या दरम्यान माहिती आणि टोकन्सचे हस्तांतरण करण्यास अनुमती देतात.

सेतू खालील गोष्टी सक्षम करतात:

  • मालमत्ता आणि माहितीचे क्रॉस-चेन हस्तांतरण.
  • ला विविध ब्लॉकचेनच्या सामर्थ्यांमध्ये प्रवेश करणे – ज्यामुळे त्यांच्या क्षमता वाढतात (कारण प्रोटोकॉलकडे आता नाविन्यपूर्णतेसाठी अधिक डिझाइन स्पेस आहे).
  • वापरकर्त्यांना नवीन प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणे आणि विविध चेनच्या फायद्यांचा लाभ घेणे.
  • विविध ब्लॉकचेन इकोसिस्टममधील विकासकांना सहयोग करणे आणि वापरकर्त्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म तयार करणे.

स्तर २ (L2) वर टोकन्स सेतूद्वारे कसे पाठवायचे


सेतूचे उपयोग

खाली काही परिस्थिती दिल्या आहेत जिथे तुम्ही सेतू वापरू शकता:

कमी व्यवहार शुल्क

समजा तुमच्याकडे इथरियम मेननेटवर ETH आहे परंतु विविध dapps एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला स्वस्त व्यवहार शुल्क हवे आहे. तुमचे ETH मेननेटवरून इथेरियम L2 रोलअपवर सेतूद्वारे पाठवून, तुम्ही कमी व्यवहार शुल्काचा आनंद घेऊ शकता.

इतर ब्लॉकचेनवरील Dapps

जर तुम्ही USDT पुरवण्यासाठी इथरियम मेननेटवर आवे वापरत असाल परंतु पॉलिगॉन् वर आवे वापरून USDT पुरवण्यासाठी तुम्हाला मिळणारा व्याजदर जास्त असेल.

ब्लॉकचेन इकोसिस्टम्स एक्सप्लोर करा

जर तुमच्याकडे इथरियम मेननेटवर ETH असेल आणि तुम्हाला त्यांचे मूळ dapps वापरून पाहण्यासाठी एखादे alt L1 एक्सप्लोर करायचे असेल. तुम्ही तुमचे ETH इथरियम मेननेटवरून alt L1 वर हस्तांतरित करण्यासाठी सेतू वापरू शकता.

मूळ क्रिप्टो मालमत्ता बाळगणे

समजा तुम्हाला मूळ बिटकॉइन (BTC) बाळगायचे आहे, परंतु तुमच्याकडे फक्त इथरियम मेननेटवर निधी आहे. इथेरियमवर BTC चा अनुभव घेण्यासाठी, तुम्ही Wrapped Bitcoin (WBTC) खरेदी करू शकता. तथापि, WBTC हे इथेरियम नेटवर्कचे मूळ टोकन आहे, ज्याचा अर्थ असा की ते बिटकॉइनची इथेरियम आवृत्ती आहे आणि बिटकॉइन ब्लॉकचेनवरील मूळ मालमत्ता नाही. मूळ BTC बाळगण्यासाठी, तुम्हाला सेतू वापरून तुमची मालमत्ता इथेरियमवरून बिटकॉइनवर पाठवावी लागेल. हे तुमचे WBTC सेतूद्वारे पाठवेल आणि त्याचे मूळ BTC मध्ये रूपांतर करेल. वैकल्पिकरित्या, तुमच्याकडे BTC असू शकते आणि तुम्हाला ते इथेरियम प्रोटोकॉलमध्ये वापरायचे असेल. यासाठी दुसऱ्या मार्गाने सेतू वापरण्याची आवश्यकता असेल, BTC वरून WBTC कडे जे नंतर इथेरियमवर मालमत्ता म्हणून वापरले जाऊ शकते.

तुम्ही केंद्रीकृत एक्सचेंज वापरून वरील सर्व गोष्टी देखील करू शकता. तथापि, तुमचा निधी आधीपासूनच एक्सचेंजवर असल्याशिवाय, यात अनेक टप्पे समाविष्ट असतील आणि सेतू वापरणे तुमच्यासाठी अधिक सोयीचे ठरेल.

सेतूंचे प्रकार

सेतूंचे अनेक प्रकारचे डिझाईन्स आणि गुंतागुंत असतात. साधारणपणे, सेतू दोन श्रेणींमध्ये विभागले जातात: विश्वासार्ह (trusted) आणि विश्वासरहित (trustless) सेतू.

विश्वासार्ह सेतूविश्वासरहित सेतू
विश्वासार्ह सेतू त्यांच्या ऑपरेशन्ससाठी मध्यवर्ती संस्था किंवा प्रणालीवर अवलंबून असतात.विश्वासरहित सेतू स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि अल्गोरिदम वापरून कार्य करतात.
त्यांच्याकडे निधीची कस्टडी आणि सेतूच्या सुरक्षिततेच्या संदर्भात विश्वास गृहीतके असतात. वापरकर्ते बहुधा सेतू ऑपरेटरच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतात.ते विश्वासरहित असतात, म्हणजेच सेतूची सुरक्षा अंतर्निहित ब्लॉकचेनच्या सुरक्षिततेइतकीच असते.
वापरकर्त्यांना त्यांच्या क्रिप्टो मालमत्तेवरील नियंत्रण सोडावे लागते. द्वारे, विश्वासरहित सेतू वापरकर्त्यांना त्यांच्या निधीवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतात.

थोडक्यात सांगायचे तर, आपण असे म्हणू शकतो की विश्वासार्ह सेतूंमध्ये विश्वास गृहीतके असतात, तर विश्वासरहित सेतू किमान-विश्वास असतात आणि अंतर्निहित डोमेन्सच्या पलीकडे नवीन विश्वास गृहीतके बनवत नाहीत. या संज्ञांचे वर्णन खालीलप्रमाणे केले जाऊ शकते:

  • विश्वासरहित: अंतर्निहित डोमेन्सच्या समतुल्य सुरक्षा असणे. जसे अर्जुन भुपतानी यांनी या लेखात (opens in a new tab) वर्णन केले आहे.
  • विश्वास गृहीतके: प्रणालीमध्ये बाह्य पडताळणीकर्ते जोडून अंतर्निहित डोमेन्सच्या सुरक्षिततेपासून दूर जाणे, ज्यामुळे ते क्रिप्टो-आर्थिकदृष्ट्या कमी सुरक्षित होते.

या दोन दृष्टिकोनांमधील मुख्य फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, चला एक उदाहरण घेऊया:

कल्पना करा की तुम्ही विमानतळाच्या सुरक्षा चेकपॉईंटवर आहात. चेकपॉईंट्सचे दोन प्रकार आहेत:

  1. मॅन्युअल चेकपॉईंट्स — अधिकाऱ्यांद्वारे चालवले जातात जे बोर्डिंग पास देण्यापूर्वी तुमच्या तिकीट आणि ओळखीचे सर्व तपशील व्यक्तिचलितपणे तपासतात.
  2. सेल्फ चेक-इन — एका मशीनद्वारे चालवले जाते जिथे तुम्ही तुमच्या फ्लाइटचे तपशील टाकता आणि सर्वकाही बरोबर असल्यास बोर्डिंग पास प्राप्त करता.

मॅन्युअल चेकपॉईंट हे विश्वासार्ह मॉडेलसारखेच आहे कारण ते त्याच्या ऑपरेशन्ससाठी तृतीय पक्षावर, म्हणजेच अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. एक वापरकर्ता म्हणून, तुम्ही योग्य निर्णय घेण्यासाठी आणि तुमची खाजगी माहिती योग्यरित्या वापरण्यासाठी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवता.

सेल्फ चेक-इन हे विश्वासरहित मॉडेलसारखेच आहे कारण ते ऑपरेटरची भूमिका काढून टाकते आणि त्याच्या ऑपरेशन्ससाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. वापरकर्ते नेहमी त्यांच्या डेटावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना त्यांच्या खाजगी माहितीसह तृतीय पक्षावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नसते.

अनेक ब्रिजिंग सोल्यूशन्स या दोन टोकांच्या दरम्यानची मॉडेल्स स्वीकारतात ज्यामध्ये विश्वासहीनतेचे प्रमाण वेगवेगळे असते.


सेतू वापरा

सेतू वापरल्याने तुम्हाला तुमची मालमत्ता वेगवेगळ्या ब्लॉकचेनवर हलवता येते. येथे काही संसाधने आहेत जी तुम्हाला सेतू शोधण्यात आणि वापरण्यात मदत करू शकतात:


सेतू वापरण्याचे धोके

सेतू विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. हे शक्य आहे की इष्टतम सेतू डिझाइन अद्याप शोधले गेले नाही. कोणत्याही प्रकारच्या सेतूशी संवाद साधण्यात जोखीम असते:

  • स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जोखीम — कोडमधील बगचा धोका ज्यामुळे वापरकर्त्याचा निधी गमावला जाऊ शकतो
  • तंत्रज्ञान जोखीम — सॉफ्टवेअर बिघाड, सदोष कोड, मानवी त्रुटी, स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण हल्ले वापरकर्त्याच्या ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणू शकतात

शिवाय, विश्वासार्ह सेतू विश्वास गृहीतके जोडत असल्याने, त्यांच्यात अतिरिक्त धोके असतात जसे की:

  • सेन्सॉरशिप जोखीम — सेतू ऑपरेटर सैद्धांतिकदृष्ट्या वापरकर्त्यांना सेतू वापरून त्यांची मालमत्ता हस्तांतरित करण्यापासून रोखू शकतात
  • कस्टोडियल जोखीम — सेतू ऑपरेटर वापरकर्त्यांचा निधी चोरण्यासाठी संगनमत करू शकतात

वापरकर्त्याचा निधी धोक्यात असतो जर:

  • स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये बग असेल
  • वापरकर्त्याने चूक केली
  • अंतर्निहित ब्लॉकचेन हॅक झाली
  • विश्वासार्ह सेतूमध्ये सेतू ऑपरेटर्सचा दुर्भावनापूर्ण उद्देश असेल
  • सेतू हॅक झाला

अलीकडील एक हॅक Solana चा Wormhole सेतू होता, जिथे हॅक दरम्यान 120k wETH ($325 दशलक्ष USD) चोरीला गेले होते (opens in a new tab). ब्लॉकचेनमधील अनेक शीर्ष हॅक्समध्ये सेतूंचा समावेश होता (opens in a new tab).

वापरकर्त्यांना इथेरियम L2s वर ऑनबोर्डिंग करण्यासाठी आणि विविध इकोसिस्टम्स एक्सप्लोर करू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सेतू महत्त्वपूर्ण आहेत. तथापि, सेतूंशी संवाद साधण्यात समाविष्ट असलेले धोके लक्षात घेता, वापरकर्त्यांनी सेतू करत असलेल्या तडजोडी समजून घेतल्या पाहिजेत. या क्रॉस-चेन सुरक्षिततेसाठी काही धोरणे (opens in a new tab) आहेत.


पुढील वाचन