मुख्य आशयावर जा

इथेरियम एक्सचेंजेस जोडणे

ethereum.org वर नवीन एक्सचेंजेस सुचवण्याची कोणालाही मुभा आहे.

आम्ही सध्या त्यांची यादी येथे देतो:

हे पृष्ठ वापरकर्त्याला ते कुठे राहतात हे प्रविष्ट करण्याची आणि ते कोणते एक्सचेंजेस वापरू शकतात हे पाहण्याची अनुमती देते. यामुळे कोणत्याही भौगोलिक मर्यादा लवकर समोर येण्यास मदत होते.

या संदर्भामुळे, जेव्हा तुम्ही एखादे एक्सचेंज सुचवता तेव्हा आम्हाला काही विशिष्ट माहितीची आवश्यकता असते.

टीप: जर तुम्हाला विकेंद्रित एक्सचेंज सूचीबद्ध करायचे असेल, तर आमचे वॉलेट्स आणि dapps सूचीबद्ध करण्याचे धोरण पहा.

आम्हाला काय हवे आहे

  • एक्सचेंजला लागू असलेल्या भौगोलिक मर्यादा. एक्सचेंजशी संबंधित भौगोलिक मर्यादा एक्सचेंजच्या वेबसाइटवरील समर्पित पृष्ठावर किंवा विभागात तपशीलवार असाव्यात.
  • ETH खरेदी करण्यासाठी वापरकर्ते वापरू शकणारी चलने
  • एक्सचेंज ही एक कायदेशीर ट्रेडिंग कंपनी असल्याचा पुरावा
  • तुमच्याकडे असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती – ही कंपनीबद्दलची माहिती असू शकते जसे की कार्यान्वित असलेली वर्षे, आर्थिक पाठबळ इ.

आम्हाला या माहितीची आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही अचूकपणे वापरकर्त्यांना ते वापरू शकतील असे एक्सचेंज शोधण्यात मदत करू शकू.

आणि जेणेकरून ethereum.org ला अधिक खात्री वाटेल की एक्सचेंज ही एक कायदेशीर आणि सुरक्षित सेवा आहे.


तुमचे एक्सचेंज जोडा

जर तुम्हाला ethereum.org वर एक्सचेंज जोडायचे असेल, तर GitHub वर एक इश्यू (issue) तयार करा.

इश्यू तयार करा (opens in a new tab)