मुख्य आशयावर जा
Change page

ERC-777 टोकन मानक

चेतावणी

ERC-777 योग्यरित्या लागू करणे कठीण आहे, कारण ते विविध प्रकारच्या हल्ल्यांना बळी पडू शकते (नवीन टॅबमध्ये उघडते). त्याऐवजी ERC-20 वापरण्याची शिफारस केली जाते. हे पृष्ठ ऐतिहासिक संग्रहण म्हणून ठेवले आहे.

परिचय?

ERC-777 हे एक विनिमयक्षम टोकन मानक आहे जे विद्यमान ERC-20 मानकामध्ये सुधारणा करते.

पूर्वतयारी

हे पृष्ठ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आम्ही शिफारस करतो की तुम्ही प्रथम ERC-20 बद्दल वाचावे.

ERC-777 हे ERC-20 पेक्षा कोणत्या सुधारणा सुचवते?

ERC-777 हे ERC-20 पेक्षा खालील सुधारणा प्रदान करते.

हुक्स

हुक्स हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या कोडमध्ये वर्णन केलेले एक फंक्शन आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्टद्वारे टोकन पाठवले किंवा प्राप्त केले जातात तेव्हा हुक्स कॉल केले जातात. यामुळे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या टोकन्सवर प्रतिक्रिया देण्याची अनुमती मिळते.

हुक्सची नोंदणी आणि शोध ERC-1820 (नवीन टॅबमध्ये उघडते) मानकाचा वापर करून केला जातो.

हुक्स उत्तम का आहेत?

  1. हुक्स एकाच व्यवहारामध्ये कॉन्ट्रॅक्टला टोकन पाठवण्याची आणि कॉन्ट्रॅक्टला सूचित करण्याची अनुमती देतात, ERC-20 (नवीन टॅबमध्ये उघडते) च्या विपरीत, ज्यामध्ये हे साध्य करण्यासाठी दुहेरी कॉल (approve/transferFrom) आवश्यक असतो.
  2. ज्या कॉन्ट्रॅक्ट्सनी हुक्सची नोंदणी केलेली नाही ते ERC-777 शी विसंगत आहेत. जेव्हा प्राप्तकर्त्या कॉन्ट्रॅक्टने हुकची नोंदणी केलेली नसते तेव्हा पाठवणारे कॉन्ट्रॅक्ट व्यवहार रद्द करेल. हे नॉन-ERC-777 स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये चुकून होणारे ट्रान्सफर प्रतिबंधित करते.
  3. हुक्स व्यवहार नाकारू शकतात.

डेसिमल्स

हे मानक ERC-20 मध्ये निर्माण झालेला decimals बद्दलचा गोंधळ देखील सोडवते. ही स्पष्टता डेव्हलपरचा अनुभव सुधारते.

ERC-20 सह बॅकवर्ड कंपॅटिबिलिटी

ERC-777 कॉन्ट्रॅक्ट्सशी अशा प्रकारे संवाद साधला जाऊ शकतो जणू काही ते ERC-20 कॉन्ट्रॅक्ट्स आहेत.

पुढील वाचन

EIP-777: टोकन मानक (नवीन टॅबमध्ये उघडते)